22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे कुटुंबातील ८ जणांची हत्या

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे कुटुंबातील ८ जणांची हत्या

छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एकाच कुटुंबातील ८ जणांची कु-हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यानेच या निर्घृण हत्या केल्या. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. तामियाजवळील जंगलात वसलेल्या बोदलकछार या आदिवासीबहुल गावात हे प्रकरण घडले आहे. ज्या व्यक्तीने ही हत्या केली ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या करण्यात आलेले ८ जण झोपेत असताना आरोपीने एक एक करून त्यांना संपवले.

दरम्यान, या हल्लयात एका १० वर्षीय मुलावरही कु-हाडीने वार करण्यात आले असून, त्याला गंभीर अवस्थेत छिंदवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या सामूहिक हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. घटनास्थळाजवळील लोकांचा आरडाओरडा ऐकून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

यानंतर त्याने सुमारे १०० मीटर अंतरावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री २-३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच माहुलझीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गाव सील केले असून, हत्येचे कारण समजू शकले नाही. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR