नांदेड : प्रतिनिधी
सिडकोतील एन डी (१२०) भागात राहणा-या एकाच कुटुंबातील आठ जणांनी सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्या होत्या त्यामुळे त्यांना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयामध्ये सर्वांवर उपचार सुरू असून यातील एक मुलगी शनिवारी सायंकाळी दगावली. आता सात जणांची प्रकृती स्थिर आहे .
सिडको भागातील रहिवासी असलेले परिवारातील ८ ते १० जणांनी बाभुळगाव ता. नांदेड परीसरातुन सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. त्या शेंगा रात्री उकडून खाल्ल्या. त्यामुळे बुधवारी रात्री सर्वांनी त्यांना मळमळ होऊ लागली. लागलीच गुरुवारी सकाळी दहा जणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले .
दरम्यान शनिवारी सायंकाळी मीरा नामदेव खानजोडे वय १४ वर्षे या मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य सात जणांची प्रकृती स्थिर आहे.त्याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत.
विषबाधा झालेल्या मध्ये शोभा नामदेव खानजोडे वय ५०, वर्षे स्रेहल शिवाजी तलवारे १३ वर्षे, बबन शंकर खानजोडे वय ५७ वर्षे ,सुलाबाई बबन खानजोडे वय ५२ वर्ष ,अनिल बबन खानजोडे वय ३५ वर्षे ,जानू अनिल खानजोडे वय २७ वर्षे, सोनाली नामदेव खानजोडे व वय १८ वर्षे यांच्यावर उपचार सुरू असून मयत मुलीचे वडील नामदेव खानजोडे यांना उपचार यानंतर सुट्टी देण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यामध्ये नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.