22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणूक आयोगाने जप्त केले ८ हजार ८८९ कोटी

निवडणूक आयोगाने जप्त केले ८ हजार ८८९ कोटी

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीदरम्यान पाचव्या टप्प्यापर्यंत निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने जवळपास ८ हजार ८८९ कोटींचे घबाड जप्त केले आहे. यामध्ये रोकडसह अवैध वस्तूंचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या मते हा आकडा लवकरच ९ हजार कोटींचा टप्पा पार करणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विविध संस्थांनी आतापर्यंत ८ हजार ८८९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या ३ टप्प्यांतील प्रचार जोमात सुरू आहे. प्रलोभनाद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नांंवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीईओंना निर्देश दिले आहेत.

४५ टक्के हिस्सा ड्रग्जशी संबंधित
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये ४५ टक्के हिस्सा ड्रग्जच्या रुपाने जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या ८ हजार ८८९ कोटींचे घबाड जप्त केले. त्यापैकी ३९५८ कोटी रुपयांची मालमत्ता ड्रग्जसंबंधीची आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सातत्याने पाठपुरावा, जिल्ह्यांचा सातत्यपूर्ण आढावा आणि यंत्रणांच्या दक्षतेमुळे १ मार्चपासून आतापर्यंत एवढी मोठी रक्कम जप्त केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR