नवी दिल्ली : हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. बुधवार (ता.२०) अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. देशभरात ८० हजार मुस्लिम भाविकांकडून अर्ज करण्यात आले आहे. देशासाठी १ लाख ७५ हजारांचा कोटा असल्याने इच्छुक भाविकांना अर्ज करण्यासाठी हज कमिटीतर्फे अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत भाविकांना अर्ज करता येणार आहे.
मुस्लिम समाजात हज यात्रेस अतिशय महत्त्व आहे.
दरवर्षी मुस्लिम बांधवांसाठी हज कमिटीतर्फे यात्रेचे आयोजन केले जाते. देशभरातून लाखाच्या संख्येने भाविक यात्रेस जात असतात. यंदा हज यात्रेनिमित्ताने देशासाठी १ लाख ७५ हजारांचा कोटा देण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी हज कमिटीतर्फे प्रथम बुधवार (ता. २०) पर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीत देशभरातून सुमारे ८० हजार कमिटी प्राप्त झाले आहे. अजूनही १ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याने कमिटीतर्फे इच्छुक भाविकांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे. सुमारे २५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आल्याने आता १५ जानेवारीपर्यंत भाविकांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी होऊन सुमारे जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारी सुरुवातीस लकी ड्रॉ होण्याची शक्यता आहे.