23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबटाटा, कांदा, टोमॅटोच्या दरात ८१ टक्क्यांनी वाढ

बटाटा, कांदा, टोमॅटोच्या दरात ८१ टक्क्यांनी वाढ

पुणे : प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात महागाई वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. महागाई दर हा ५ टक्क्यांपर्यंत गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अन्नधान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या दरात ८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे व्हेज थाळीच्या किमतीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या घाऊक भावात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या वर्षभरात बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत ८१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशभरात या तिन्ही भाज्यांच्या सरासरी दरात कमालीची वाढ झाली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, ३० एप्रिल २०२३ रोजी बटाट्याची सरासरी किंमत १८.८८ रुपये प्रति किलो होती. जी १० जून २०२४ पर्यंत ३०.५७ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच बटाट्याच्या दरात किलोमागे ११.६९ रुपयांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात बटाट्याचे भाव ६२ टक्क्यांनी वाढले आहेत.

गेल्या वर्षभरात कांद्याच्या भावात १३.५० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दराने सर्वसामान्यांना रडवले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात २० ते २१ रुपये किलो मिळणारा कांदा आज रोजी ३३.९८ रुपये झाला आहे. याचाच अर्थ गेल्या एका वर्षात कांद्याच्या भावात ६६ टक्के वाढ झाली आहे.

वर्षभरात टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ
गेल्या वर्षभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किमतीत वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बटाटे आणि कांद्याच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, ३० एप्रिल २०२३ रोजी टोमॅटोची किरकोळ किंमत २०.५५ रुपये प्रति किलो होती. आज रोजी या टोमॅटोची किंमत ३७.११ रुपयांपर्यंत गेली आहे. याचा अर्थ टोमॅटोच्या किमतीत गेल्या वर्षभरात ८१ टक्के म्हणजेच १६.५६ रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किमतीत मोठी वाढ
दरम्यान, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर या पिकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ३० रुपये किलोने विकला जाणारा बटाटा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ४१ रुपये किलो दराने विकला जातोय. कांदा ४३ ते ४७ रुपयांनी विकला जातोय. दरम्यान, या वस्तूंच्या महागाईमुळे व्हेज थाळी देखील महाग झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR