25.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात दोन भीषण अपघातात १२ ठार

पुण्यात दोन भीषण अपघातात १२ ठार

अनेक गंभीर जखमी

पुणे : पुण्यात दोन भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सहा जण ठार असून काहीजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणा-या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसमध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत झाला आहे. तर उर्वरित गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जेजुरीजवळ अपघातात ३ जणांचा मृत्यू
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन भीषण झाला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत एकाच वस्तीतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरावर शोककळा पसरली आहे. रमेश किसन मेमाणे (६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (४०) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (६५) अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही पुरंदर तालुक्यातील बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे येथील रहिवाशी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR