24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसमुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ४ मुलींचा मृत्यू, १ मुलगा बेपत्ता

समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ४ मुलींचा मृत्यू, १ मुलगा बेपत्ता

सिंधुदुर्ग : देवगड समुद्रकिना-यावर मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाले असून यामधील चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता आहे.

दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रकिनारी पर्यटनासाठी पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्रकिना-यावर पोहोचल्यानंतर आंघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामुळे या ग्रुपमधील काही जण समुद्रात आंघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

यात चार मुली आणि एक मुलगा होता. चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलिस सहकारी, तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटनास्थळी दाखल झाले.

पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. यातील पाच जण समुद्रात बुडाले. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. ही घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारासची आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR