26.7 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeराष्ट्रीयसर्व ट्रकमध्ये आता एसी केबिन अनिवार्य!

सर्व ट्रकमध्ये आता एसी केबिन अनिवार्य!

रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी १ ऑक्टोबर २०२५ पासून नियम लागू

नवी दिल्ली : वातानुकूलीत यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये एन २ आणि एन ३ श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल असेही रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशातील ट्रकची खराब स्थिती पाहता भारत सरकारने सर्व ट्रकमध्ये एसी केबिन अनिवार्य केल्या आहेत. २०२५ पासून, सर्व नव्या ट्रकमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असतील असे एक नोटीस जारी करत रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, २०२५ पासून प्रत्येक नव्या केबिनमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असणे अनिवार्य आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारने फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन अनिर्वाय करण्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, १ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर उत्पादित सर्व एन २ आणि एन ३ श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल. अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, वातानुकूलीत यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये एन २ आणि एन ३ श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल. या मानकांमुळे ट्रक उत्पादकांना एसी सिस्टीमसह सुसज्ज केबिनसह चेसिस विकण्याचा मार्गही मोकळा होईल. सध्या, ट्रक बॉडी तयार करणारे बिल्डर्स फिट करतात. त्यामुळे ट्रकच्या डॅशबोर्डसह एसी केबिनमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे ट्रक उत्पादक कंपन्यांना आता ते स्वत: बसवावे लागणार आहेत. यामुळे केबिनमध्ये बसण्यासाठी वाहन बॉडी बिल्डर्सची गरज नाहीशी होईल. नॉन-प्रॉफिटेबल ऑर्ग्नायजेशनने २०२० मध्ये १० राज्यांमध्ये ट्रक ड्रायव्हर्सचे सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक ट्रक ड्रायव्हर्सनी ब-याचदा थकल्यानंतर किंवा झोप येत असतानाही ते ट्रक चालवत असतात, या गोष्टी स्विकारल्या होत्या.

एन २ कॅटेगरी कोणती?
या कॅटेगरीमध्ये ज्यांचे एकूण वजन ३.५ टनांपेक्षा जास्त आणि १२ टनांपेक्षा कमी आहे, अशा अवजड वाहनांचा समावेश होतो.

अर्थव्यवस्थेसाठी लॉजिस्टिक अत्यंत महत्वाची
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चालकांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला आणि अधिक ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करून चालकांची कमतरता दूर करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले होते. गडकरी म्हणाले होते की, चालकांच्या कमतरतेमुळे भारतात चालक १४ ते १६ तास सतत काम करत असतात, तर इतर देशांमध्ये त्यांचे कामाचे तास निश्चित असतात. ते म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे आणि त्यासाठी लॉजिस्टिक खूप महत्त्वाची आहे. गडकरी म्हणाले की, जगाच्या तुलनेत आमचा भांडवल खर्च १४-१६ टक्के आहे. चीनमध्ये ते ८-१० टक्के आहे, युरोपियन देशांमध्ये ते १२ टक्के आहे. निर्यात वाढवायची असेल तर भांडवल खर्चात कपात करावी लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR