भोपाळ : मोहन यादवांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील परेड ग्राऊंडवर सकाळी ११.३० वाजता मोहन यादव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला केंद्र सरकारमधील नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.
मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. खासदार राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल यांनी उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
भोपाळमध्ये हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शानदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.