32.9 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeसोलापूरसोलापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन

सोलापूर – हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबवली जात आहे. या हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तर प्रदेश सरकारने बंदी आणली आहे, त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी. तसेच येत्या 22 जानेवारी 2024 अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांस मुक्त करावी, अशा मागण्या येथील जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनमगेट) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आल्या.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, विक्रम घोडके, धनंजय बोकडे, गोपी व्हनमारे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु राष्ट्र प्रतिष्ठानचे . किशोर बिरबनवाले, दत्तात्रय गायतोंडे यांसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. धान्य, फळे, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल डेटिंग साईट आदी सर्वच क्षेत्रे ‘हलाल सर्टिफाईड’ करून व्यापार्‍यांचे शोषण केले जात आहे. भारत शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतांनाही व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी 47 हजार रुपये शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. तसेच नुतनीकरणासाठी दरवर्षी 20 हजार 500 रुपये द्यावे लागत आहेत.

येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्यामुळे देशभरातून कोट्यवधी हिंदू भाविक हे भगवान श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी अयोध्येला पोहोचणार आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. या मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. हरिद्वार आणि ऋषीकेश येथेही मद्य-मांस यांवर 100 टक्के बंदी आहे. याच धर्तीवर अयोध्यानागरी संपूर्णपणे मद्य-मांस मुक्त करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR