परभणी : विविध क्षेत्रातील डॉक्टरांचे मराठवाडास्तरीय एक दिवशीय चर्चासत्र पॉलीट्रॉमाकॉन २०२४चे दि. १४ जानेवारी रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोशिएशनचे परभणी शाखाध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या चर्चासत्रामध्ये मराठवाडातील दिग्गज न्यूरोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, चेस्ट फिजिशियन, ऑथोर्पेडिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट आणि भूलतज्ञ उपस्थित राहणार आहेत. या चर्चा सत्रासाठी ८ ते १० हजार विविध क्षेत्रातील डॉक्टरांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील ज्या डॉक्टरांनी उत्कृष्ट अविरत रूग्णांसाठी सेवा केली आहे. त्या डॉक्टरांना शकुंतला रामराव गवाळे सोशल फाऊंडेशन तर्फे मराठवाडा रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे मानकरी डॉ. उन्मेश टाकळकर (जनरल सर्जन, छत्रपती संभाजीनगर), डॉ. रमाकांत बेंबडे (प्लास्टिक सर्जन, छत्रपती संभाजीनगर), डॉ. ऋतुराज जाधव (नूरो सर्जन नांदेड) आहेत.
या कार्यक्रमाचे विनीत इंडीयन मेडीकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रमोद शिंदे, आर. पी. मेडीकल कॉलेज परभणीचे डीन डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावर असून आयोजक पॉलीट्रॉमाकॉन २०२४ अध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, डॉ. श्रीकृष्ण कात्नेश्वरकर, डॉ. श्रीकांत झांबरे, डॉ. एकनाथ गबाळे, डॉ. अमिताभ कडतन, डॉ. निहार चांडक, डॉ. निनाद सुर्यतळे, डॉ. सागर मोरे आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन परभणीच्या वतीने सर्व डॉक्टरांना मोठ्या संख्येने या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.