23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे पोलिसांच्या कामात अडथळा करणा-या चौघांवर गुन्हा

धाराशिव येथे पोलिसांच्या कामात अडथळा करणा-या चौघांवर गुन्हा

धाराशिव : प्रतिनिधी
एमपीडीए आदेश पारित करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकास पाहून आत्महत्या करण्याचा एकाने प्रयत्न केला. पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार १३ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील साठे नगर येथे घडला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाणे येथे चौघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १३ डिसेंबर रोजी सकाळी साठे नगर येथे एमपीडीए आदेश पारित करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अविनाश दिलीप भोसले, सुग्रीव अंकुश पवार, रवि अरलिंग्या पवार, चमेली अविनाश भोसले या चौघांनी पोलिस हवालदार फिर्यादी हुसेन नसीर खॉन सय्यद यांना शासकीय कामात अडथळा आणला. आरोपी यांच्या राहते घरी एमपीडीए आदेश पारीत करण्यासाठी गेल्यानंतर आरोपी अविनाश भोसले यांनी स्वत:चे हाताने व चाकूने छातीवर, पोटावर वार करुन घेवून जखमी धाला.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी रवि व सुग्रीव तसेच चमेली यांनी सदरचा आदेश पारीत करण्यास अटकाव करुन धक्काबुक्की करुन खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. या सर्वांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी हुसेन सय्यद यांनी दि.१३ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे कलम ३५३, ३०९, १८९, ५०६, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR