नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. जगभरातील अनेक देशांनी त्यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी गुरुवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील नेतृत्वासाठी २०१४ पासून १४ देशांच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१४ पासून भारताच्या पंतप्रधानांना १४ देशांचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आणि संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार मिळाला आहे.