15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeधाराशिवगुटख्याची वाहतूक करणारी इनोव्हा कार जप्त

गुटख्याची वाहतूक करणारी इनोव्हा कार जप्त

धाराशिव : प्रतिनिधी
तालुक्यातील अंबेजवळगा शिवारात गुटख्याची वाहतूक करणारी इनोव्हा कार पोलीसांनी पकडली. यावेळी पोलीसांनी कारसह ३ लाख ७ हजार २०० रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई दि.१४ डिसेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणी निहाल काझी रा. खाजानगर, धाराशिव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ग्रामीण ठाण्याचे पोलिस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली होती. एक सिल्वर रंगाची इनोव्हा कार ही अंबेजवळगे शिवारातुन अवैध गुटखा वाहतूक करीत आहे. पथकाने तातडीने समोरुन येणारी इनोव्हा वाहन क्र एम.एच. १४ व्ही १६४२ अडवून चेक केली. त्यामध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी इनोव्हा कार व गुटखा असा एकूण ८ लाख ८४ हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी आरोपी कार चालक निहाल माजिद काझी याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR