पाथरी : येथील तहसील कार्यालय येथे प्रकाश देव केदारे आज शानिवार, दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता पासून अन्नत्याग अमरण उपोषणास सुरू केले आहे. यावेळी महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील सर्व प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते. या आंदोलनाला माजी खा. चंद्रकांत खैरे, मा. आ. अर्जुनराव खोतकर, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपुडकर यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. माजी पालकमंत्री अतुल सावे यांनी आमरण उपोषण तूर्तास मागे घ्यावे असे आवाहन केले.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंडळातील सहकारी यांनी परशुराम अर्थिक विकास महामंडळ घोषना करून येणा-या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असे ब्राह्मण समाजास पोकळ आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाजात तीव्र नाराजीचा सुर पसरलेला आहे. जो पर्यंत अधिकृत परशुराम अर्थिक विकास महामंडळ बाबतीत महाराष्ट्र शासन परीपत्रक (जी आर) येत नाही तो पर्यंत अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही असा इशारा केदारे यांनी दिला आहे.
यावेळी निखील लातुरकर नांदेड, सुरेश मुळे जालना, गजानन जोशी बीड, बाळासाहेब थिगळे बीड, सचिन वाडेपाटील छ. संभाजीनगर, विश्वजीत देशपांडे, पुणे काकासाहेब कुलकर्णी सोलापुर, संजय सुपेकर, विठ्ठगुरू वझुरकर, लक्ष्मीकांत दडके, नंदुकाका पराडकर, योगेश सोनपेठकर, सुरेंद्र नेब, डॉ. राजेंद्र चौधरी, सुधाकर गोळेगावकर, विनायकराव देशमुख, अशोक देवा वैभव मुळे नरेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील, सुहास ब्रह्मपुरीकर व पाथरी परिसरातील ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.