21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeधाराशिवकेसरजवळगा येथे चोरी, रोकड व सोन्याचे दागिने लंपास

केसरजवळगा येथे चोरी, रोकड व सोन्याचे दागिने लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे चोरट्यांनी एका महिलेचे घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार ५८४ रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना १५ डिसेंबर रोजी भरदुपारी घडली. या प्रकरणी अनुसया विजयकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाणे येथे दि. १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरजवळगा ता. उमरगा येथील अनुसया विजयकुमार पाटील (वय ४० वर्षे) ह्या त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने १५ डिसेंबर रोजी लग्नासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम १ लाख १६ हजार २८४ रूपये व १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ७८ हजार ५८४ रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी फिर्यादी अनुसया पाटील यांनी दि.१६ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पोलीस ठाणे येथे कलम ४५४, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR