24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरअंगणवाडया १५ दिवसापासून कुलूप बंद

अंगणवाडया १५ दिवसापासून कुलूप बंद

लातूर : प्रतिनिधी
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करावी व इतर मागण्यासाठी अंगणवाडीचे कर्मचारी ४ डिसेंबर पासुन राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे लातूर जिल्हयातील २ हजार ३२४ अंगवाडया गेल्या १५ दिवसापासून कुलूप बंद आहेत. या अंगणवाडयात शिक्षण घेणा-या लहान बालकांचे शिक्षण व पोषण आहार थांबला आहे. लातूर जिल्हयातील २ हजार ३२४ अंगणवाडयात ३ ते ६ या वयोगटातील ६३ हजार बालके पूर्व शालेय शिक्षण घेतात. या बालकांना खिचडी, गोड लापसी असा अंगणवाडीमध्ये पोषण आहार नियमित दिला जातो. अंगणवाडीतील पूर्व शालेय शिक्षणातून व पोषण आहारातून विद्यार्थ्यांची शारीक व बौध्दीक वाढ होत असते.

या विद्यार्थ्यांचा विकासाचा हा पाया व्यवस्थीत होण्याचे काम याच काळात होते. तो मजबूत नसेल तर पुढची वाटचाल दिशाहीन होते. हे कोरोना कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याच्या संदर्भाने वारंवार समोर येत आहे. जिल्हयातील २ हजार ३२४ अंगवाडयात १ हजार ९३७ अंगणवाडी सेविका व २ हजार ११२ मदतनिस कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. तर मदतनीस मुलांना अंगणवाडीत घेवून येणे, खाऊ शिजवणे, स्वच्छता राखणे, बालकांना खाऊ वाटप करणे आदी कामे करतात. अंगणवाडी सेविका व मदतनिस गेल्या १५ दिवसापासून संपावर गेल्याने अंगणवाडया कुलूप बंद आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR