22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदाऊदवर विषप्रयोग?; रुग्णालयात उपचार सुरू

दाऊदवर विषप्रयोग?; रुग्णालयात उपचार सुरू

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानातील कराचीमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधेमुळे त्याच्यावर रुग्णालयात अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत उपचार सुरू असल्याची बातमी पाकिस्तानात वा-यासारखी पसरली आहे.

रुग्णालयातील दाऊदवर उपचार सुरू असलेला संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला असून, केवळ जवळचे नातेवाईक आणि रुग्णालयाशी संबंधित ठराविक जणांनाच प्रवेश दिला जात असल्याचीही माहिती आहे. जगातील ‘मोस्ट वाँटेड’च्या लिस्टमध्ये टॉपवर असलेला दाऊद नेमका कुठे आहे, याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. तो पाकिस्तानात असल्याचा संशय अनेक देशांना आहे. पण पाकिस्तानकडून हे दावे सातत्याने फेटाळले जातात. आता दाऊदवर कराचीतील रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, दाऊदवर मागील दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. जिथे उपचार सुरू आहेत, त्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली असून, दाऊदच्या उपचाराबाबतची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून केला जात असल्याचे म्हटले आहे.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुलाने दाऊद हा कराचीत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला जानेवारी महिन्यात सांगितले होते. त्याने दुसरा विवाह केल्याचा दावाही केला होता. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दाऊदचे नातेवाईक किंवा पाकिस्तानातील कोणत्याही यंत्रणेकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR