डोमगांव : प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील डोमगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शालन माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळन करीत जल्लोष केला.
डोमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव पोफळे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव पारित झाल्याने त्यांना सरपंचपद सोडावे लागले होते. त्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी दि. १४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी शालन माळी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सिद्दीक शेख यांनी शालन माळी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी निवडीच्या बैठकीला उपसरपंच दैवशाला खैरे, ग्रामपंचायत सदस्या सीमा मिस्कीन, वर्षा साबळे, मुक्ताबाई चव्हाण, सुनंदा पाटील, बाबासाहेब गायकवाड, हर्षद साबळे उपस्थित होते. यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच नूतन सरपंच शालन माळी यांच्या समर्थक कार्यकत्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळून करीत जल्लोष केला.
यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापू मिस्कीन, उद्योजक हनुमंत पाटील, डॉ. संजय जहागिरदार, सोमनाथ साबळे, दत्ता साबळे, डॉ. जोतीराम मिस्कीन, सहदेव खैरे, शहाजी पाटील, राजाभाऊ लोमटे, बबन काळे, बाबूराव काळे, नितीन गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, तात्या राऊत, रतिलाल मिस्कीन, राजकुमार मिस्कीन, सचिन गणगे, संजय लोमटे, दादा लोमटे, प्रविण पाटील, भारत मिस्कीन, डॉ. मोहन काळे, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिद्दीक शेख, सहाय्यक म्हणून आकाश वानखडे यांनी काम पाहिले.