19 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeसोलापूरकामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करावा

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करावा

सोलापूर : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी केले. श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात लैंगिक छळ प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जोशी हे बोलत होते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी व सचिव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जोशी यांनी विशाखा विरुध्द राजस्थान सरकार या खटल्याबदल सांगितले की, राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींचा विवाह करु नये म्हणून सामाजिक कार्यकर्त्या भंवरीदेवी या गावक-यांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करत होत्या. मात्र, गावामध्ये जुनी प्रथा, परंपरा, रूढींमुळे गावकऱ्यांना हे पटले नाही.

उलट त्यांनी भंवरीवर गावकरी लोकांनी सामूहिक दुष्कर्म केले अन् तिचा छळ केला. तिने न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. स्त्रीयांसाठी काम करणार्‍या महिला स्वयंसेवी विशाखा नावाच्या संघटनेने विशाखा नावाने सर्वोच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका १९९७ मध्ये दाखल केली. कामाच्या ठिकाणी जसे की, शासकीय व निमशासकीय कार्यालय, कारखाने, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती गठन करण्यासाठी सांगितले. तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे पैनल विधिज्ञ सरोजनी तमशेट्टी म्हणाल्या, लैंगिक गुन्हांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करतो, या कायद्यामध्ये गुन्हेगारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. महिलांना याबाबत मदत हवी असेल तर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरच्या मोबाइलवर (८५९१९०३६१३) संपर्क साधावा.

या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. टी. ए. चव्हाण यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुवर्णा भरगंडे यांनी केले तर एस. बी. जमगे यांनी आभार मानले. शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक शमशोदीन नदाफ, विजय माळवदकर, रितेश हिंगमिरे, युवराज मायनाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR