31.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeसोलापूरकोईमतूर एक्स्प्रेसमध्ये महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

कोईमतूर एक्स्प्रेसमध्ये महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

कुर्डुवाडी : कोईमतूर एक्स्प्रेसने कल्याण ते रायचूर असा प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५१ हजारांचा ऐवज असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. याबाबत अफसाना रफिक चौधरी (रा. अंबरनाथ वेस्ट ठाणे, मुंबई) यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कुडूवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी अफसाना चौधरी या गाडी नं. ११०१३ कोईमतूर एक्स्प्रेसने बोगी नं एस ७ मधून प्रवास करत होत्या. ही गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकातून पुढे गेली आणि सोलापूर येण्यापूर्वी फिर्यादीने टूथपेस्ट घेण्यासाठी पाहिले असता त्यांना त्यांची दागिने व रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. यात १ लाख ४० हजारांचा सोन्याचा हार, ३५ हजारांचा छोटा सोन्याचा हार, ३५ हजारांचे कानातले, १७ हजार ५०० रुपयांची सोन्याची दोन अंगठ्या, ६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५१ हजारांचा ऐवज होता. याबाबत टीटीई फॉर्मवरुन गुन्हा नोंद झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR