20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी गोल्डन कार्डचे बंधन

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी गोल्डन कार्डचे बंधन

सोलापूर : प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत) व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून शासकीय नोकरदारांसह शुभ्र, केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारक कुटुंबांतील सदस्यांनाही पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रुग्णांना १२०९ आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५१ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. त्यासाठी रुग्णाकडे योजनेचे गोल्डन कार्ड असायला हवे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सातत्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन ३१ डिसेंबरपूर्वी जनआरोग्य योजनेतील सर्व लाभार्थीचे गोल्डन कार्ड काढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार आशासेविकांसह आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी आणि जिल्ह्यातील १८ हजार महिला बचत गट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी सलंग्नीत महाविद्यालये, सहकार विभागाकडील गाव पातळीवरील विकास कार्यकारी सोसायट्यांचे सचिव, रेशन दुकानदार व शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून हे कार्ड काढून दिले जात आहेत. त्याशिवाय गावागावातील ऑनलाइन सुविधा केंद्रांवरूनही हे कार्ड काढता येणार आहे.

तसेच लाभार्थीला स्वतःलाही त्यांच्या मोबाईलवरून हे कार्ड काढता येणार आहे. कार्ड नसलेल्या रुग्णांना तुर्तास उपचार मोफत घेण्यासाठी त्यांच्याकडे आधारकार्ड, केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७,६१,१७२ असून योजनेचे लाभार्थी २३,४७,५५५ गोल्डन कार्डधारक ६.१० लाख आहेत. गोल्डन कार्ड काढण्याची मुदत २६ जानेवारी २०२४ आहे.

गोल्डन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड किंवा १२ अंकी क्रमांक असलेले रेशनकार्ड आवश्यक आहे. चालू मोबाईल क्रमांक , ‘आयुष्यमान भवं’ हे अ‍ॅप्लिकेशन घेऊन त्यावर लॉगिन करून स्वतः कार्ड काढण्याचा पर्याय निवडून माहिती भरून ते सबमिट करू शकतात. सोलापूर : डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल, डॉ. कासलीवाल हॉस्पिटल, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, अश्विनी ग्रामीण रूग्णालय, सोलापूर कॅन्सर सेंटर, हृदयम हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, युगंधर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री माकैडेय हॉस्पिटल, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर,

■ पंढरपूर : उपजिल्हा रूग्णालय, सेवा हॉस्पिटल, लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नवजीवन शिशू हॉस्पिटल, पंढरपूर सुपरस्पेशालिटी अ‍ॅण्ड गॅलॅक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, चिरंजीव हॉस्पिटल, अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल, वरद विनायक हॉस्पिटल,

■ बार्शी: सुविधा आयसीयू अ‍ॅण्ड कॅथलॅब सेंटर, जगदाळे मामा हॉस्पिटल, कल्याणरावजी भातलवंडे बालरूग्णालय आयसीयू सेंटर, अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च अ‍ॅण्ड रिलिफ सोसायटी, प्रामोण रूग्णालय, सुश्रुत हॉस्पिटल,

■ सांगोला : वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. लवटे ऑथों. हॉस्पिटल अ‍ॅण्ड ट्रॉमा सेंटर, दक्षता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, श्रीनंद हॉस्पिटल, महद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सदगुरू हॉस्पिटल.

■ माढा : पाटील हॉस्पिटल, टेभुर्णी, मित्रप्रेम हॉस्पिटल (माढा).

■ माळशिरस : देवडीकर मेडिकल सेंटर (अकलूज), अकलूज क्रिटिकल केअर अ‍ॅण्ड ट्रॉमा सेंटर, सूर्यवंशी ट्रॉमा अ‍ॅण्ड रिहॅबिटेशन सेंटर, कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज,युनिटी हॉस्पिटल, नातेपुते.
■ मोहोळ : ग्रामीण रूग्णालय,

■ करमाळा: समर्थ बालरुग्णालय व उपजिल्हा रूग्णालय करमाळा

मंगळवेढा : महिला हॉस्पिटल, दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गजानन लोकसेवा अशी मोफत उपचाराची जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांची यादी आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील २३ लाख ४७ हजार ५५५ लाभार्थीना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून दिले जात आहे. लाभार्थी स्वतः ही कार्ड काढू शकतो. योजनेतील कोणत्याही रूग्णालयात हे कार्ड दाखविल्यानंतर त्या रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील असे वरिष्ठ जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सोलापूर डॉ. माधव जोशी यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR