नवी दिल्ली : भारतातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अनेक माथे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यापूर्वी पाटणा, मुंबई आणि बंगळुरू येथे इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर होणारी ही बैठक विशेष मानली जात आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव, शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीत दाखल झाले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही दिल्लीत पोहोचले आहेत. ते इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासोबतच तामिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या पूरस्थितीमुळे ते पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.