17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत; मराठवाड्यात धावणार

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत; मराठवाड्यात धावणार

मुंबई : देशभरात आपल्या वेगामुळे लोकप्रिय असलेली वंदे भारत रेल्वे सध्या राज्यात पाच ठिकाणी धावत आहे. आता महाराष्ट्राला सहावी वंदे भारत रेल्वे मिळाली आहे. वंदे भारत लवकरच मराठवाड्यातून धावणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि कोइंबतूर-बंगळूरु येत्या ३० तारखेपासून धावणार आहे. तसेच पूल-पूश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत.

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. सहा दिवस धावणारी या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या. आता ३० डिसेंबरपासून मुंबई ते जालना ही रेल्वे सुरु होणार आहे. प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR