23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरट्रॅक्टर-कार अपघातात तीन शिक्षकांसह चार जणांचा मृत्यू

ट्रॅक्टर-कार अपघातात तीन शिक्षकांसह चार जणांचा मृत्यू

औसा : प्रतिनिधी
औसा- नागपूर – ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून औसा शहराजवळ कार व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्ँक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक व कार मधील तीन शिक्षक हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि २२डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.

याबाबतची माहिती अशी की औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला खरोसा येथील मुख्याध्यापक संजय बाबूराव रणदिवे त्यांचे सहकारी शिक्षक जयप्रकाश मोतीराम बिराजदार हे दोन व किल्लारी येथील रहिवासी तथा आनंदवाडी ता औसा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महेबुब मुनवरखान पठाण हे एका खासगी कारने बोरफळ रोड ने औशाकडे येत असताना नागरसोगा उड्डाण पुलाजवळ आले असताना समोरुन जाणाऱ्या ऊसाची वाहतूक करणारा ट्र्ँक्टर जात होता.

या ट्रँक्टरला कारची धडक बसली व कार मधील कारचालक राजेसाब बागवान ( रा किल्लारी ) याच्यासह तीन ही शिक्षक जागीच ठार झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा समोर अर्धा भाग पूर्ण चक्काचूर झाला असून गाडीत रक्त व मांस सगळीकडे विखुरलेले होते .कारमधील मृतदेह काढण्यासाठी क्रेन, कटर, जेसीबी चा वापर करावा लागला. तब्बल दोन तासाचे प्रयत्नाने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR