30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरशिवाई प्रतिष्ठान लावणार अडीच हजार झाडे

शिवाई प्रतिष्ठान लावणार अडीच हजार झाडे

लातूर : प्रतिनिधी

सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख देणा-या येथील शिवाई प्रतिष्ठानने लातूर शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी रोपनिर्माण, वृक्षारोपन अन वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला असून त्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते वृक्षारोपनाने झाला. शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा निलंगेकर, सचिव डॉ. शुभांगी राऊत, उषा भोसले, संध्या श्ािंदे, डॉ. मिनाक्षी पौळ पाटील आंिदसह सर्व शिवाईं तसेच वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, अनिल वारद यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी शिवाईच्या या कार्याचे कौतूक करीत शिवाईचा हा संकल्प, स्तुत्य असून अशा विधायक कार्याचा अधिकाधिक विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक शिवाईंनी आपापल्या गॅलरीकिंवा परिसरात किमान दहा झाडे लावून ती जगवावीत असे आवाहन केले. शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा निलंगेकर यांनी शिवाई प्रतिष्ठान व वृक्षप्रतिष्ठान यांच्या संयुक्त्त विद्यनाने हा उपक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत स्थानिक प्रजातींच्या सुमारे अडीच हजार बियांपासून रोपे तयार केले जाणार असून त्यानंतर शहरातील विविध भागात त्याचे रोपन केले जाणार असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR