20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमनोरंजनअरबाजने केले दुस-यांदा लग्न

अरबाजने केले दुस-यांदा लग्न

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड ५६ वर्षीय अभिनेता अरबाज खान आणि मेकअप आर्टिस्ट शूरा खान यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली होती. युलिया वंतूरनंतर अरबाज शूराला डेट करत असल्याचं म्हटलं जात होते. या चर्चांमध्येच अरबाजने शूरासोबत थेट निकाह करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अरबाजने त्यांच्या निकाहचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती अरबाज-शुराने लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे अत्यंच गोपनीय पद्धतीने हा निकाह सोहळा झाला. या लग्नसोहळ्याला अरबाजचा लेक अरहान खान सुद्धा उपस्थित होता. अरबाजचा-शुराचा हा निकाह सोहळा अर्पिता खानच्या घरी पार पडला.

अरबाज आणि शुरा यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने निकाह केला. यावेळी अरबाजने फ्लोरल प्रिंट असलेली शेरवानी परिधान केली होती. तर, शुराने अरबाजला मॅच होणा-या प्रिंटचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. यावेळी शुरानेही कमीत कमी मेकअप आणि ज्वेलरी घातली होती. परंतु, या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

अरबाज-शुराच्या निकाहमध्ये रितेश देशमुख,जेनेलिया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर आणि युलिया वंतूर यांनी हजेरी लावली होती.
अरबाजच्या निकाहला अभिनेत्री रविना टंडनने लेक राशासोबत हजेरी लावली होती. या निकाहनंतर तिने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत या जोडीला सुभेच्छा दिल्या होत्या.

२०१७ मध्ये अरबाज- मलायकाचा झाला घटस्फोट
१९९८ मध्ये अरबाज आणि मलायका या जोडीने लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१७ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले. या दोघांना अरहान हा एकुलता एक मुलगा असून घटस्फोटानंतरही ही जोडी त्याचा व्यवस्थित सांभाळ करत आहेत. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानं

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR