25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रसुरक्षारक्षकावर हल्ला करून पळाले सहा विधिसंघर्षग्रस्त

सुरक्षारक्षकावर हल्ला करून पळाले सहा विधिसंघर्षग्रस्त

नागपूर: नागपुरच्या पाटणकर चौक परिसरात असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहातून सहा विधिसंघर्षग्रस्त सुरक्षारक्षकांवर हल्ला करून पळाले असल्याची घटना उघडकीस आली आहे. पळालेले विधिसंघर्षग्रस्तांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे. रविवारच्या दुपारी या अल्पवयीन मुलांना थंडी निमित्य बाहेर उन्हात काढले असता त्यातील सहा मुलांनी हा डाव साधत पळ काढला आहे. पळून जाण्यापूर्वी या मुलांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची ताडफोड केली. पळालेले सर्व मुलं १७ वर्षे वयोगटातील असून या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या मुलांचा शोध सुरू केला आहे.

बालसुधार गृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या काळात यांच पाटणकर चौक परिसरातील महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहामध्ये दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, ही घटना ताजी असतांनाचा याच रिमांड होममधून ६ विधिसंग्रघर्षग्रस्त पळाले असल्याने या विधिसंघर्षग्रस्त कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असे प्रकार
नागपूरच्या पाटणकर पाटणकर चौक परिसरातील असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बालकांना ठेवले जाते. रविवारी पळालेले हे सहाही विधिसंघर्षग्रस्त विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. यातील दोघांवर खुनाचा व एकावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. तसेच इतर तिघे अट्टल चोर आहेत. कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे आणि बालकांच्या संदर्भातील कायदे कठोर असल्याने या मुलांना सांभाळणे अतिशय अवघड झाले आहे. प्रामुख्याने मनुष्यबळाची कमतरता असल्याने रिमांड होममधून विधिसंघर्षग्रस्त पळून जाण्याचे प्रकार वाढले असल्याचे निदर्शनात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR