19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरधनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

चाकुर : प्रतिनिधी

तालुक्यातील आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले (वय ३३ वर्षे) या तरूणाने अनेक वेळा धनगर आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होऊन धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलनात सहभागी झाला होता. वेगवेगळ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत कोणत्याही पक्षाने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या नैराश्यातून त्याने चिट्टी लिहून दि. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री आष्टा येथील रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भागवत मामडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

रमेश फुले यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले असून वडीलोपार्जीत शेती नसल्याने आई वडील, रमेश व त्याची पत्नी मोल मजूरी करुन आपली उपजिवीका भागवत होते. रमेश यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच विविध समाज बांधव घटनास्थळी दाखल झाले. नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा रमेश फुलेंच्या कुटुंबियांनी घेतला. त्यानंतर धनगर समाज विकास परिषद या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गोयकर, अशोक करडिले, रमेश पाटील, सुधाकर हेमनर, सतिश गाडेकर, नारायण काचे, अमोल घायाळ, बालाजी इरळे, राम वाघमोडे, ओम देवकत्ते आदी समाज बांधवांनी तहसिलदार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.

रमेश फुले यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखाची आर्थिक मदत मिळावी, कुटुंबातील एका व्यक्त्तीला शासकीय नौकरीत घ्यावे, नोकरीत एक महिन्याच्या आत समावून घेण्याचे लेखी हमीपत्र द्यावे, फुले यांच्या कुटुंबीयांस घरकुल तसेच शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, सरकारने याची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंंमलबजावणी करावी, आदी मागण्याचे निवेदन चाकूरचे तहसिलदारमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मागास वर्गीय आयोग, गृहमंत्री, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी यांना माहितीत्सव लेखी निवेदन देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR