25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमनोरंजनरुबिना दिलैकने शेअर केला जुळ्या मुलींचा पहिला फोटो

रुबिना दिलैकने शेअर केला जुळ्या मुलींचा पहिला फोटो

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला हे आई-बाबा झाले आहेत. रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. नुकतेच अभिनव आणि रुबिनाने त्यांच्या जळ्या मुलींचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.

रुबिनाने सप्टेंबरमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. रुबिनाने एक महिन्यापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या मुलींचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रुबिना आणि अभिनव हे त्यांच्या मुलींना घेऊन बाल्कनीमध्ये उभे आहेत, असे दिसत आहे.

रुबिना आणि अभिनव यांनी फोटोला कॅप्शन दिले, आमच्या मुली, जीवा आणि ईधा आज एक महिन्याच्या झाल्या आहेत हे सांगताना खूप आनंद होत आहे. गुरुपूरबच्या शुभ दिवशी ब्रह्मांडाने आम्हाला आशीर्वाद दिला! रुबिना आणि अभिनव यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते दोघे पूजा करताना दिसत आहेत.

रुबिना दिलैकने अभिनव शुक्लासोबत जून २०१८ मध्ये लग्न केले. त्यानंतर अभिनव आणि रुबिना यांनी बिग बॉस-१४ मध्ये सहभाग घेतला. रुबिना ही ‘बिग बॉस-१४’ या कार्यक्रमाची विजेती ठरली. रुबिनाने छोटी बहू, जीनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR