32.9 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeराष्ट्रीयएडहॉक समितीकडे कुस्ती संघाची जबाबदारी; आयओएचा निर्णय

एडहॉक समितीकडे कुस्ती संघाची जबाबदारी; आयओएचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आयओएने तीन सदस्यीय एडहॉक कुस्ती समिती स्थापन केली आहे. भूपिंदरसिंग बाजवा यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले असून एमएम सौम्या आणि मंजुषा कुंवर हे सदस्य असणार आहेत. आता कुस्ती संघाची जबाबदारी एडहॉक समितीकडे देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाला (डब्लूएफआय) निलंबित केल्यानंतर तीन दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (२४ डिसेंबर) डब्लूएफआयला निलंबित केले होते. यामागे, मंत्रालयाने म्हटले होते की, नवनिर्वाचित मंडळाने प्रक्रियेचे पालन केले नाही आणि कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ न देता अंडर -१५ आणि अंडर-२० राष्ट्रीय चॅम्पियनशिपची घाईघाईने घोषणा केली.

अलीकडेच, भाजप खासदार बृजजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची डब्लूएफआयच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया
यांनी या निवडीचा निषेध करत कुस्तीपटूंनी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR