28.5 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeसोलापूरअस्मिता कोळी आत्महत्या प्रकरणी शिक्षकासह दोघास जामीन मंजूर

अस्मिता कोळी आत्महत्या प्रकरणी शिक्षकासह दोघास जामीन मंजूर

सोलापूर : मयत अस्मिता मल्लिनाथ कोळी वय: १९, रा:-शिवशाही शंकर नगर, होडगी रोड,सोलापूर हिचे आत्महत्या प्रकरणी धऱ्याप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी शिरभाते यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की,मयत अस्मिता ही मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती, सोलापूर या प्रशालेत इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती. तसेच त्याच प्रशालेतील शिकणाऱ्या मुलासोबत तिचे प्रेम संबंध होते व त्या दोघांनी एकमेकांना विवाह करण्याचे वचन दिले होते, परंतु सदर शाळेचे संस्थापक धऱ्याप्पा हत्तुरे व सुधाकर कामशेट्टी हे मयत अस्मिता हिस शाळेतून काढून टाकतो व तुझी बदनामी करतो, अशी धमकी देत होते त्यामुळे अस्मिता हिने दि: १५ /१२ /२०२३ रोजी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,अशा आशयाची फिर्याद मयत अस्मिता हिचे वडील मल्लिनाथ कोळी यांनी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून धऱ्याप्पा व सुधाकर यांनी अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांचे मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता अर्जदारांनी मयत अस्मिता हिस आत्महत्येस प्रवृत्त अथवा प्रेरित केले असे दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला,त्यावरून न्यायाधीशांनी ५०,०००/- रुपयांच्या जातमुचलक्यावर पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात अर्जदारतर्फे अ‍ॅड.मिलिंद थोबडे,ऍड.विनोद सूर्यवंशी,ऍड.संजय हत्तुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR