24.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यावर जलसंकट!

मराठवाड्यावर जलसंकट!

- ३८ शहरांमध्ये फेब्रुवारी-मार्चनंतर पाणी टंचाई - विभागीय प्रशासनाचा अहवाल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे विभागातील ७६ पैकी ३८ शहरांवर फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावात एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३ -२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे, मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक गावे
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार ६५२ गावांचा अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत आहे. आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर १३५६ गावातील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आतअसून, जालना जिल्ह्यातील ९७१ गावे, परभणी ८३२ गावे, हिंगोली ७०७ गावे, नांदेड १५६२ गावं, लातूर ९५२ गावे बीड १३९७ गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील ७१९ गावातील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR