उदगीर/ प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ उदगीर आगार येथे वाहक क्रमांक २६८३२ या क्रमांकाच्या पदावर वाहक म्हणून नेमणुकीस असलेले गुलाब शामराव जगताप रा. शिराढोण ता.निलंगा, जिल्हा लातूर हे दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी ते कर्तव्यावर असताना त्यांच्या छातीत वेदना होऊन दुखत होते. त्यांची कर्तुत्व ड्युटी चालू असल्याने त्यांनी लागलीच उपचार घेता आले नाही. त्यांना होत असलेला त्रास अंगावर घेत त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावित येऊन ते उदगीर आगार येथे येऊन त्यांच्या ताब्यातील गाडी उदगीर आगार येथे जमा करून ते लागलीच दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवून अॅडमिट झाले असता डॉक्टरांनी सांगितले की, तुम्हाला हृदयविकारांचा झटका आल्याचे सांगितले व पुढील उपचार घेणे कामे विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे त्यांना अॅडमिट केले.
तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचार कामे सूर्य सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे दि.२२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३ रोजी पावेतो उपचार चालू असताना दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून 58 मिनिटांनी त्यांना ह्रदयविकारांचा परत त्रीवृ झटका आल्याने त्यांना तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्यावर दि.२७ डिसेंबर वार बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या मूळ गावी मौजे शिरढोण ता. निलंगा जिल्हा लातूर येथे सार्वजनिक समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी आजपावेतो अतिऊत्कृष्ट अशी ३० वर्ष सेवा निष्टेने केली. त्यांना सेवानिवृत्त होण्याकरिता एक वर्षाचा कालावधी बाकी असतानाच कर्तृत्वावर येऊन गेलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.