20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeराष्ट्रीयमहर्षि वाल्मिकी यांच्या नावाने ओळखले जाणार 'अयोध्या विमानतळ'?

महर्षि वाल्मिकी यांच्या नावाने ओळखले जाणार ‘अयोध्या विमानतळ’?

नवी दिल्ली : अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या नव्या विमानतळाचे उद्घाटन ३० डिसेंबरला होणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. दरम्यान, वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून आता अयोध्या विमानतळ ओळखले जाणार आहे. वृत्तसंस्थेला सूत्रांनी ही माहिती दिली असून लवकरच केंद्र सरकार याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येला भेट देणार असून ते पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील. नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली. ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राज्याला समर्पित करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील येथे ते राज्यातील १५,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे ११,१०० कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे ४६०० कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR