20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeक्रीडाभारताचा नामुष्कीजनक पराभव

भारताचा नामुष्कीजनक पराभव

सेंच्युरियन : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसरा डाव १३१ धावांत संपुष्टात आणत पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला. आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराट कोहलीने ७६ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, गिलचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर मार्को येनसेनने ३ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली. त्याने दुस-या डावात नाबाद ८३ धावांचे योगदानही दिले होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १० बाद ४०८ धावा केल्या. यजमानांनी पहिल्या डावात १६३ धावांची मोठी आघाडी घेतली होती.

भारताचा डावाने पराभव
मार्को येनसेनने ७६ धावा करून एकाकी झुंज देणा-या विराट कोहलीला बाद करत भारताचा दुसरा डाव १३१ धावात संपवला. याचबरोबर भारताचा एक डाव आणि ३१ धावांनी पराभव झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR