25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रशेगाव मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर राहणार खुले

शेगाव मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर राहणार खुले

बुलढाणा : संत गजानन महाराजांच्या द्वारी नवीन वर्षाचे संकल्प करण्याकरिता अनेकजण शेगाव नगरीत दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी शेगावात भाविकांची मोठी गर्दी असते. हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज यांचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

सध्या नाताळच्या सुट्या सुरु असून, २५ डिसेंबरपासून शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामध्ये अनेक भाविक कुटुंबासह मुक्कामी राहण्याच्या बेताने दाखल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने रविवार ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरवात करता येईल. श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR