29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्र१५०० किलो जिवंत जिलेटीन आणि ७० किलो डेटोनेटर जप्त

१५०० किलो जिवंत जिलेटीन आणि ७० किलो डेटोनेटर जप्त

रायगड : थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १५०० किलो जिवंत जिलेटीन आणि ७० किलो डीटोनेटर जप्त करण्यात आली आहेत. या मालाची टेंपोतून बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणाना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. ही स्फोटके पुण्यातून रायगडमध्ये आणत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

३१ डिसेंबर आणि नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. ख्रिसमसची सुट्टी आणि थर्टीफस्ट यामुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागली आहेत. मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी कोकणच्या समुद्र किना-यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडला पर्यटकांची पहीली पसंती देत आहेत. त्यामुळे रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. अलिबाग, मुरुडसह श्रीवर्धनमध्ये पर्यटकाची गर्दी वाढली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस हाऊसफुल्ल झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR