16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्र.. तर फडणवीसांच्या दारात बसू; मनोज जरांगेंचा इशारा

.. तर फडणवीसांच्या दारात बसू; मनोज जरांगेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहे. दरम्यान, मनोज जरंगे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणारच आहे. खूप ताकतीने समाज एकत्र येणार आहे. जर आंदोलनासाठी परवानगी नाही मिळाली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील आणि नागपुरातील दारात बसू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

जरांगे म्हणाले की, २० जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी परतणार. मुंबईतील समाजाने एकत्रित यावे. आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील आणि नागपूरातील घरासमोर बसणार आहे. मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. मराठा बांधवांनी घाबरू नये उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलन येतील, असा दावा जरांगेंनी केला आहे. मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहे. मुंबईला जाण्यासाठी चार दिवस लागू दे किंवा आठ दिवस लागू दे २० जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे.

तसेच जरांगें यांचे शिष्टमंडळ मुंबईतील मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहचले असून मैदानाची पाहणी केली जात आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदाने लागणार आहेत. त्यामुळे आाता सरकारची जबाबदारी त्यांनी मैदान द्यावीत. आमची दिशा मुंबई आणि ध्येय आरक्षण आहे. सर्व जण पायी मुंबईला जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR