28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसीआयएसएफच्या प्रमुखपदी प्रथमच महिला अधिकारी

सीआयएसएफच्या प्रमुखपदी प्रथमच महिला अधिकारी

नीना सिंह सीआयएसएफच्या प्रमुखपदी देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे. राजस्थान केडरच्या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी नीना सिंग यांना ही जबाबदारी मिळाली आहे. ते विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर सरकारी इमारतींच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. नीना राजस्थान पोलिसांच्या पहिल्या महिला डीजीदेखील आहेत.

नीना सिंह सध्या सीआयएसएफच्या विशेष डीजी पदावर होत्या. त्या २०२१ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाली. तिची सेवानिवृत्ती ३१ जुलै २०२४ रोजी होणार आहे, तोपर्यंत ती सीआयएसएफ प्रमुख पदावर राहणार आहे. नीना सिंह २०१३ ते २०१८ दरम्यान सीबीआयच्या सहसंचालक होत्या. या काळात त्यांनी अनेक हायप्रोफाइल केसेसवर काम केले. २०२० मध्ये त्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकदेखील प्रदान करण्यात आले. नीना सिंह यांनी नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांच्यासोबत दोन शोधनिबंधही लिहिले आहेत.

नीना सिंह यांचा खास प्रकल्प
नीना सिंह यांची २००० मध्ये राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी त्यांनी महिलांसाठी एक कार्यक्रम आखला. यामध्ये आयोगाचे सदस्य वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन महिलांशी बोलायचे, त्यांच्या समस्या ऐकायचे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. नीना सिंह यांनी २००५-२००६ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी पोलिस स्टेशन्स लोकांसाठी अधिक सुलभ बनविण्याच्या प्रकल्पावर काम केले.

सिंह यांच्याविषयी
नीना सिंह यांचे पती आयएएस अधिकारी आहेत. आयपीएस नीना सिंह यांचे पती रोहित कुमार सिंह हेदेखील राजस्थान केडरचे आयएएस आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत ते राजस्थानमध्ये प्रधान सचिव (आरोग्य) होते. ते सध्या केंद्रीय ग्राहक मंत्रालयात सचिव आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR