सोलापूर – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक केंगनाळकर शिक्षण संकुलाच्या मैदानात पार पडली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजीमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, सुनील कटारे, तालुका प्रमुख योगिराज पाटील, आनंद बुक्कानुरे उपस्थित होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या आढावा बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ यंत्रणा सक्षम करणे, गाव तिथे शाखा स्थापन करणे, घराघरात शिवसैनिक निर्माण करणे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भगवा सप्ताहाचे आयोजन संपूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघात करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. भगवा सप्ताहदरम्यान रक्तदान शिविर, व्याख्यान, आरोग्य शिबिर, अनाथ आश्रमामध्ये खाऊ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन दक्षिण विधानसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे शहर प्रमुख केंगनाळकर यांनी सांगितले. याप्रसंगी राजू बिराजदार, अजय खांडेकर, राहुल गंधुरे, प्रिया बसवंती, पूजा खंदारे, प्रज्ञा पंडित,मीनल दास, आनंद थोरात, अजित स्वामी, जयराम सुंचू, सचिन माने,महेश गिराम, महिबूब बागवान,कबीर शेख आदी उपस्थित होते.