25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रयुतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील

युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात घडणा-या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज अनेक चर्चा पाहायला मिळतात. शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत होत्या. पण सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अशातच आता याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील, तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाहीत कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानीय राज ठाकरे घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही.

राजकारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. २०२४ च्या पोटात काय दडले आहे हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल, असे संदीप देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा वारसा आहे, तो राज ठाकरेंकडेच.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR