25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeराष्ट्रीयलखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित

लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित

नवी दिल्ली : कॅनडामध्ये वास्तव्यास असणा-या लखबीर सिंग लांडा याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (यूएपीए) ही कारवाई करत लखबीर सिंग लांडा याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला आहे. मोहाली येथील पंजाब स्टेट इंटेलिजेन्स हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यात लखबीर सिंग लांडा याचा सहभाग होता. तसंच अनेक ठिकाणी वसुली, हत्या, बॉम्बस्फोट, हत्यारांसह अमली पदार्थांच्या तस्करीत तो सक्रिय आहे अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या लखबीर सिंग लांडा याचा जन्म १९८९ साली पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यात झाला होता. लहानपणापासूनच विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लखबीर याने २०१७ साली कॅनडामध्ये पलायन केले. खलिस्तानवाद्यांशी संबंधित असलेला लखबीर सिंग लांडा याने ९ मे २०२२ मध्ये मोहालीमध्ये रॉकेटच्या मदतीने ग्रेनेड हल्ला केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास पथक त्याच्या शोधात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR