केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात असून, त्यातील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुस-या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. कारण पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता दुस-या कसोटी सामन्यात त्याला मुकावे लागले आहे.
कोएत्झीने आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये खळबळ माजवली होती. आणि आठ सामन्यांमध्ये १९.८० च्या सरासरीने २० विकेट घेतल्या होत्या. कोएत्झीला अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने विकत घेतले. याआधी टेंबा बावुमाही दुखापतीमुळे दुस-या कसोटीतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी डीन एल्गर दुस-या कसोटीत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.