सोलापूर : ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून नंदुरबार येथील एकाने चव्हाणवाडीतील एकाची तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय सदाशिव जगताप (४५, रा. चव्हाणवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुलाबसिंग बिगजा ठाकरे (वय २५, रा. अकराणी, ता. तळोदा, जि. नंदुरबार) याच्याविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मुकादम गुलाबसिंग याने विश्वासाने फिर्यादी संजय जगताप यांच्याकडून ३ लाख रुपये १० कोयते म्हणजेच २० ऊसतोड मजूर पुरविले नाहीत.
ऊसतोड मजूर न पुरविता घेतलेले तीन लाख रुपयेही दिले नाहीत म्हणून टेंभुर्णी पोलिसांत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल हजारे हे करीत आहेत.
यंदाच्या साखर हंगामात ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून अनेकांनी कारखानदारांची फसवणूक केली आहे. टेंभुर्णी हद्दीत याप्रकरणी दररोज एका मुकादमाविरोधात गुन्हा दाखल होत आहे. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांकडून वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.