पुणे : राज्यातील दुष्काळी ४० तालुक्यांमधील १०२१ मंडळांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
राज्यभरातील ४० दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल १०२१ महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत, कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामधील लाखो शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील मराठवाड्यासह इतर विभागांत यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने सरकारने या ४० दुष्काळी तालुक्यांतील १०२१ महसुली मंडळातील शेतक-यांच्या शेतीसंबंधित कर्जवसुलीस स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत. या निर्णयामुळे लाखो शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.