28.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपहिलीच्या वर्गात शिकणा-या मुलीवर अत्याचार

पहिलीच्या वर्गात शिकणा-या मुलीवर अत्याचार

नराधम आरोपी एका मुलाचा बाप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पहिलीच्या वर्गात शिकणा-या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पैठण पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलिस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांचा पथक त्याचा शोध घेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR