मुंबई : श्रीमंत वर्ग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फार कमी वापर करतो. अब्जाधीश सोडा लक्षाधीश पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना फारसे दिसत नाही. कार्यालयात अथवा बाजारात जाण्यासाठी त्यांच्या दिमतीला आलिशान कार असतात. पण उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी हा समज खोटा ठरवला. वयाच्या ७३ वर्षात त्यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला. ते १२००० कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे महागड्या कारचा ताफा आहे. मुंबईतील अतिश्रीमंतात त्यांची गणना होते. पण त्यांनी लोकलने प्रवास करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
महानगरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ट्रॅफिक जॅममध्ये कित्येकदा एक एक तास अडकून पडावे लागते. किमती वेळ प्रवासातच वाया जातो. प्रदुषण वाढते. वाहतूक व्यवस्थेचा बोजावारा उडतो. त्यामुळे मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला राज्य सरकार देते. कार शेअंिरग, कार पुंिलग अशा संकल्पना पण समोर आल्या आहेत.
पण अनेक जण मोठ्या शहरात स्वत:च्या वाहनाने जाणे पसंत करतात. पण ७३ वर्षाचे निरंजन हिरानंदानी यांनी वेगळा आदर्श घालून दिला. त्यांनी लोकलने प्रवास करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास दाखवला.