नागपूर : वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ ला कस्टम व डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कारवाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका हवाई प्रवाशाकडून दोन किलो सोने जप्त करण्यात आले.
शाहजहा ते नागपूर येणा-या एअर अरेबियाच्याच्या विमानात राम टेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही विभागांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.