22.1 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रसुप्रिया ताई अजितदादांमुळेच निवडून आल्या

सुप्रिया ताई अजितदादांमुळेच निवडून आल्या

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचे असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचे स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR